Nov 23, 2009

बायको म्हणजे देवाने घडवलेले अप्रतीम यंत्र.....

बायको म्हणजे देवाने घडवलेले अप्रतीम यंत्र...

सकाळच्या गजराबरोबर सेवेस हजर,

पेस्ट आणि ब्रश दिसेल, पहिले जिथे जाईल नजर,

गरम पाणी, श्यांपु, टॉवेल, साबण, असेल सुसज्ज बाथरुम,

अंगातल्या कपड्याबरोबर चहा असेल हजर,

असंच असतं रोज सकाळचं सत्र.


बायको म्हणजे देवाने घडवलेले अप्रतीम यंत्र...

ऑफीसला जातांना गरमागरम डबा, आणि गोड मुका,

संध्याकाळी परत स्वागत, घालून पोटात दिवसभरच्या चुका,

हातातली बॅग टेबलावर जाते, संध्याकाळच्या चहा बरोबर,

'अहो ऐकले का' म्हणून ऐकू येतात गोड गोड हाका,

तिच जाणो तिचे हे अजब तंत्र,

बायको म्हणजे देवाने घडलेले अप्रतीम यंत्र.. ‌


रुचकर जेवणा बरोबर गप्पांची फोडणी असते,

डोळा लागे पर्यंत भांड्याशी तीचे युद्ध सुरुच असते,

सगळ्या घरावर शेवटचा हात मारुन,

पदराला हात पुसत गालात खुदकन हसते,

आणि कानात पुटपुटते प्रेमाचा मंत्र,

बायको म्हणजे देवाने घडलेले अप्रतीम यंत्र..


जेवले का हो.. म्हणून आठवण करून देणारे,

मनातल्या भावना लगेच जाणून घेणारे,

जीवनाच्या वाटेवर ऊन असो वा सावली,

नेहमीच सोबत देणारे, आधार होणारे,

असे आहे बायको नावाचे यंत्र...

बायको म्हणजे ...

बायको म्हणजे ... बायको म्हणजे ... बायको असते
कधी मंद दिव्याची वात, तर कधी पेटलेली मशाल असते ||

ती जेंव्हा घरात असते, माझं तिच्याशी अजिबात पटत नाही,
ती जेंव्हा घरात नसते, मला जरासुद्धा करमत नाही ||
पाणी, धोबी, दुधवाला, पेपरवाला, नाठाळ शेजा-याला
तीच व्यवस्थित हाताळू शकते. ||

घरात कुणाची, कुठली वस्तू कुठे आहे?
बँकबुक, लौकरच्या चाव्या, हातरुमाल कुठे आहे?
कुणाचा वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस कधी आहे?
सारी नोंद तिच्या मेंदुत पक्की असते ||

आला गेला पै पाहुणा, सर्वांचच ती मनापासुन स्वागत करीत असते
कोण आचरट, कोण हावरट, कोण बावळट, कोण भला
प्रत्येकाची नवी ओळख तीच करुन देत असते ||

मुलाचा अभ्यास, ग्रुहपाठ, पालकसभा, तीच अटेंड करत असते
विविध कर्जे, कशा कशाचे हप्ते, सणवार, लग्नकार्य, देणी-घेणी
अनेक आघाड्यांवर एकाचेवेळी तीच लढत असते ||
सासु-सासरे, आई-वडील, दीर, जाऊ, नणंदा आणि वहिनी
सर्वांबरोबर समभावाने ती वागत असते ||

सर्वांशी गोड बोलुन चांगुलपणा मी घेतो,
नको तिथे, नको तेवढं खरं बोलुन वाईटपणा ती घेत असते ||
वाहन मी चालवत असतो, शेजारी ती बसलेली असते,
घ्या डावीकडे, ग्या उजवीकडे, सतत मला ती सांगत असते ||
म्हैस आली संभाळा, त्या बाईकडे काय बघत बसलात,
टाका गिअर, व्हा पुढे, सतत सुचना देत असते ||

घराच्या दारावर नेमप्लेट माझी असते,
पण घराच्या आत तिचीच अनिर्बंध सत्ता असते ||
तिच्याच इशा-यावर अवघे घरदार नाच असते,
फुटकं माझं नशिब, चांगली स्थळे सोडुन तुमच्या घरी आले,
केवळ मी म्हणुन सोसलं सारं, आजवर इथं टिकुन राहिले,
तुमची काय, माझी काय, प्रत्येकाची बायको हेच म्हणत असते ..!!!

खरं सांगतो मित्रा, बायको म्हणजे , वळलं तर सुत
नाहीतर मानगुटीवर बसलेलं भुत असते..
साहेब काय, कारकुन काय, सगळ्यांची गत तीच असते ||
कुठल्याशा औफिसातल्या कुठल्याशा कोप-यात खर्डेघाशी मी करत असतो
पण आपला नवरा मोठा साहेब आहे असं जगाला सांगुन
ती माझी अब्रू झाकीत असते..||

दोन्ही हातांनी मी माझेच पैसे उधळत असतो
ती मात्र काटेकोरपणे हिशेब सगळा ठेवीत असते ||
महिना अखेरी पेट्रोलसाठी मी जेंव्हा रददी विकायला काढतो,
तेंव्हा शंभराची नोट हळुच ती माझ्या हातावर ठेवीत असते..||

वरवर राग असला तरी मनात तिच्या
रातराणीसारखी दडलेली एक प्रित असते
मी जेंव्हा कविता रचत असतो, तेंव्हा ती कविता जगत असते..||
कधी श्रावणसरींसारखी ती प्रसन्नपणे बरसत असते
तर कधी ग्रीष्मातल्या उन्हासारखी प्रछन्नपणे तळपत असते ||

तिचं बरसणं काय, तिचं तळपणं काय..
सर्वांच्या सुखासाठी ती हे सारं करीत असते ||
घरातील प्रत्यक व्यक्ती मजेत आणि आनंदात जगत असते
कारण अवघ्या घरादारासाठी ती कणाकणाने झिजत असते ||

बायको म्हणजे ... बायको म्हणजे ... बायको असते
कधी समईत तेवणारी मंद दिव्याची वात, तर कधी पेटलेली मशाल असते ||

Oct 8, 2009

दूरदेशी गेला बाबा

दूरदेशी गेला बाबा… गेली कामावर आई

नीज दाटली डोळ्यात , परि घरी कुणी नाही !! ध्रु !!

कसा चिमणासा जीव , कसाबसा रमवला

चार भिंतित धावुन दिसभर दमवला

‘ आता पुरे ! झोप सोन्या..’ कुणी म्हणतच नाही

कशासाठी कोण जाणे देती शाळेमध्ये सुट्टी ?

कोणी बोलायाला नाही…कशी व्हावी कट्टी-बट्टी ?

खेळ ठेवले मांडून … परि खेळगडी नाही !! २ !!

दिसे खिडकीमधुन जग सारे , दिशा दाही

दार उघडुन तरी तिथे धावायचे नाही

फार वाटे जावे परी – मुठीमध्ये बोट नाही !! ३ !!

नीज दाटली डोळ्यात , परि घरी कुणी नाही दूरदेशी गेला बाबा……

- संदिप खरे




Sep 3, 2009

न्यु ईयर – न्यु बॉयफ़्रेंड, जुन्याला विसरायचा नवा ट्रेंड..!

जानेवारीत तिला पाहिलं आणि प्रेम करावसं वाटलं
फेब्रुवारीत “ती” दिसल्यावर मित्रांनी तिच्याजवळ लोटलं
मार्च मध्ये “ती” माझ्याकडे पाहुन गोड हसली
एप्रिल मध्य म्हटलं पोरगी हसली, म्हणजे फसली …!

मे मध्ये मी तिच्याकडे ओढले गेलो
जुनमध्ये फक्त तिच्याच विचारांनी वेढलो गेलो
जुलै मध्ये आम्ही पावसांत भिजायच ठरवलं
ऑगस्ट मध्ये तिला बिनधास्त भिरवलं

सप्टेंबर मध्ये मी तिच्या घरी गेलो
ऑक्टोंबर मध्ये दोघे माथेरानला जाऊन आलो
नोव्हेंबरला मला एकदम स्ट्राईक झालं
एवढ्या ह्या प्रवासात तिला विचारायचच राहुन गेलं
म्हणुन ३१ डिसेंबरला तिला पार्टीला नेलं
धाडस करुन मी तिला प्रपोज केलं

त्यावर ती म्हणते कशी,
“बारा महिने एकत्र फ़िरलो
हे काय कमी झालं
अरे वेड्या, आता नविन
बॉयफ़्रेंड,
नविन वर्ष नाही का आलं?”

न्यु ईयर – न्यु बॉयफ़्रेंड, जुन्याला विसरायचा नवा ट्रेंड..!

मन हे नेहमी
फुलपाखरासारखं असावं
एकिने नाही म्हटलं तर काय झालं
लगेच दुसरीवर बसायला हवं!! “

दमलेल्या बापाची कहाणी

कोमेजून निजलेली एक परी राणी
उतरले तोंड,डोळा सुकलेले पाणी
रोजचेच आहे सारे काही आज नाही
माफी कशी मागू पोरी मला तोंड नाही
झोपेतच घेतो तुला आज मी कुशीत
निजेतच तरी पण येशील खुशीत
सांगायाचे आहे माझ्या सानुल्या फुला
दमलेल्या बापाची ही कहाणी तुला....


आटपाट नगरात गर्दी होती भारी
घामाघूम राजा तरी लोकलची वारी
रोज सकाळीच राजा निघताना बोले
गोष्ट सांगायाचे काल राहूनिया गेले
जमलेच नाही काल येणे मला जरी
आज परि येणार मी वेळेतच घरी
स्वप्नातल्या गावामध्ये मारू बघ खेळी
खर्याखुर्या परीसाठी गोष्टीतली परी
मांडीन मी थकलेल्या हातांचा झुला
दमलेल्या बापाची ही कहाणी तुला....


(संदीपचा आवाज) गद्य:
ऑफिसात उशीरा मी असतो बसून
भंडावले डोके गेले कामात बुडून
तास-तास जातो खाल मानेने निघून
एक-एक दिवा जातो हळूच विझून
अशा वेळी काय सांगू काय-काय वाटे
आठवासोबत पाणी डोळ्यांतून दाटे
वाटते की उठूनिया तुझ्या पास यावे
तुझ्यासाठी मी पुन्हा लहानगे व्हावे
उगाचच रूसावे नि भांडावे तुझ्याशी
चिमुकले खेळ काही मांडावे तुझ्याशी

(सलीलचा आवाज) पद्य:
उधळत खिदळत बोलशील काही
बघताना भान मला उरणार नाही
हसूनिया उगाचच ओरडेल काही
दुरूनच आपल्याला बघणारी आई
तरीसुद्धा दोघेजण दंगा मांडू असा
क्षणा-क्षणावर ठेवू खोडकर ठसा
सांगायाची आहे माझ्या सानुल्या फुला
दमलेल्या बापाची ही कहाणी तुला....

(संदीपचा आवाज) गद्य:
दमल्या पायाने जेव्हा येईल जांभई
मऊ-मऊ दूध भात भरवेल आई
गोष्ट ऐकायला मग येशील ना अशी
सावरीच्या उशीहून मऊ माझी कुशी

(सलीलचा आवाज) पद्य:
कुशी माझी सांगताहे ऐक बाळा काही
सदोदित जरी का मी तुझ्या पास नाही
जेवू खाऊ नाहू माखू घालतो ना तुला
आईपरी वेणी फणी करतो ना तुला
तुझ्यासाठी आईपरी बाबासुद्धा खुळा
तोही कधी गुपचूप रडतो रे बाळा
सांगायाची आहे माझ्या सानुल्या फुला
दमलेल्या बापाची या कहाणी तुला....

(संदीपचा आवाज) गद्य:
बोळक्यामध्ये लुकलुकलेला तुझा पहिला दात
आणि पहिल्यांदाच घेतलास जेव्हा तोंडी मऊ भात
आई म्हणण्याआधीसुद्धा म्हणली होतीस बाबा
रांगत रांगत घेतलास जेव्हा घराचा तू ताबा
लुटू-लुटू उभं रहात टाकलंस पाऊल पहिलं
दूरचं पहात राहिलो फक्त,जवळ पहायचंच राहिलं

(सलीलचा आवाज) पद्य:
असा गेलो आहे बाळा पुरा अडकून
हल्ली तुला झोपेतच पहातो दुरून
असा कसा बाबा देव लेकराला देतो
लवकर जातो आणि उशीरानं येतो
बालपण गेले तुझे-तुझे निसटून
उरे काय तुझ्या-माझ्या ओंजळीमधून
जरी येते ओठी तुझ्या माझ्यासाठी हसे
नजरेत तुझ्या काही अनोळखी दिसे
तुझ्या जगातून बाबा हरवेल का गं
मोठेपणी बाबा तुला आठवेल का गं
सासुराला जाता-जाता उंबरठ्यामध्ये
बाबासाठी येईल का पाणी डोळ्यामध्ये.

--- संदीप खरे आणि सलील कुलकर्णी




Aug 20, 2009

दुसरं आपल्या हातात काय असतं!

महत्वाची सुचना: ही कविता माझ्या अनुभवांवर लिहिलेली नाही

बायको जेंव्हा बोलत असते...
बायको जेंव्हा बोलत असते
तेंव्हा ऐकून घ्यायचं असतं
नाहीतरी... दुसरं आपल्या हातात काय असतं!

भडका असतो उडालेला
अनावर असतो रोष
वाभाडे काढत आपले ती
सांगत असते दोष
आपले दोष, आपल्या चुका
सारं सारं...
स्वीकारायचं असतं
नाहीतरी... दुसरं आपल्या हातात काय असतं!

शब्दानं शब्द वाढत जातो
भडकत जातो तंटा
म्हणून वेळीच ओळखायची असते
आपण धोक्याची घंटा
समोरची तोफ बरसली तरी
आपण...
तोंड उघडायचं नसतं
नाहीतरी... दुसरं आपल्या हातात काय असतं!

गरजून बरसून झाल्यानंतर
थकून जाते बायको
आग पाखडून झाल्यानंतर
शांतही होते बायको
अशाच वेळी विसरून सारं
तिला...
जवळ घ्यायचं असतं
नाहीतरी... दुसरं आपल्या हातात काय असतं!

तिची चिडचिड, तिचा संताप
प्रेमच असतं हेही
तिची बडबड, तिची कडकड
प्रेमच असतं तेही
तिचं प्रेम तिनं करावं
आपलं....
आपण करायचं असतं
नाहीतरी... दुसरं आपल्या हातात काय असत?

Aug 19, 2009

या जगातील १० सत्य

या जगातील १० सत्य


1.
ज्यांना रात्री केलेल्या कृत्याचा सकाळी उठल्यावर पश्चात्ताप होतो अश्या लोकांनी सरळ दुपारीच उठावे.


२. जाहिरातीवाचून धंदा करणे म्हणजे एखाद्या सुंदर स्त्रीने अंधारात डोळा मारण्यासारखे आहे.


३. माणसाने नेहेमी स्पष्ट बोलावे म्हणजे ऐकणाऱ्यालाही स्पष्ट ऐकू जाते.


४. मूलभूत राजकीय पक्ष दोनच- सत्ताधारी, सत्ताकांक्षी


५. दोन जोडपी समोरा समोर येतात तेंव्हा बायका एकमेकींच्या साड्या दागिने बघतात तर नवरे एकमेकांच्या बायकांकडे बघतात.


६. मुलगा आणि नारळ कसा निघेल हे आधीच सांगणे अवघड आहे.


७. प्रेम आंधळं असतं, लग्न डोळे उघडतं.


८. देवा मला वाट पाहायची शक्ती दे... तीही आज आता ताबडतोब!


९. काही माणसे जिवंत असतात कारण खून करणे बेकायदा आहे म्हणून!


१०. काळ हा सर्वोत्तम शिक्षक आहे, पण तो आपल्या सगळ्या शिष्यांचा बळी घेतो


सुविचार


१. पैसा हेच सर्वस्व नव्हे...... मास्टर कार्ड, व्हिसा कार्डही आहेत जगात!!!


२. प्राण्यांवर प्रेम करा...... ते किती चविष्ट असतात!!!


३. पाणी वाचवा...... बीअर प्या!!!


४. शेजाऱ्यावर प्रेम करा...... पकडले जाऊ नका म्हणजे झालं


Aug 10, 2009

आम्ही मराठी आहोत कारण.........

आम्ही मराठी आहोत कारण 31st December ला दणक्यात celebration केलं तरी गुढीपाडव्याला घरावर गुढी ऊभारून जीभेवर कडू-गोड गोळी ची चव चाखत मनापासून नवीन वर्षाचं स्वागत करतो..

आम्ही मराठी आहोत कारण हॉटेल मधून येताना टाइमपास
मंचुरियन खाऊन आलो तरी वरण भात आणि साजूक तुपाशिवाय आमचे भागत नाही..

आम्ही मराठी आहोत कारण रिकी मार्टिन च्या गाण्यावर आमचे पाय थिरकले
तरी बाबूजींचे 'तोच चंद्रमा नभात' ऐकल्यावर नकळतच तोंडातून 'वाह' निघून जातं..

आम्ही मराठी आहोत कारण frnds सोबत cool outfits घालून धम्माल पार्टी केली तरी
संक्रांत दस-याला मानचा फ़ेटा आणि धोतर घालून,तितक्याच उत्साहात नातेवाईकांच्या घरी जायला आम्हाला आवडतं..

आम्ही मराठी आहोत कारण कितीही imported cosmetics- perfumes वापरले तरी
त्या typical sandal साबणा शिवाय आणि उटण्या शिवाय आमची दिवाळी साजरी होऊच शकत नाही..

आम्ही मराठी आहोत कारण वर्तमानपत्रांनी कितीही कृत्रिम रंगाविषयी लिहिलं तरी
दिवसभर मनसोक्त रंग खेळल्याशिवाय एकही होळी जात नाही..

आम्ही मराठी आहोत कारण प्रवासाला जाताना गाडीतून एखादं मंदिर दिसलं की
नकळतच आमचे हात जोडले जातात..........

Aug 2, 2009

आजोबा

 जेवताना आजोबा लाडात येत,

मला आपल्या ताटातली भाकर देत;
जेवता जेवता मधेच थांबत
आणि एक भला मोठा ढेकर देत !

मी म्हणायची रागवूनः
"आजोबा, बॅड मॅनर्स,
व्हॉट आर यू डुइंग?"
आजोबांचं हसून उत्तरः
"आय अॅम जस्ट ढेकरिंग !"

आजोबांच्या खोलीत आता
धुकं... धुकं... धुकं...
आजोबांचं जग सगळं
मुकं...मुकं...मुकं...

आजोबांना पडलं होतं भलंमोठं टक्कल !
आजोबा म्हणायचेः
"ज्याला असं टक्कल
त्यालाच असते अक्कल !"

मी खिजवून म्हणायचोः
"आजोबा, यमकासाठी
घ्या आता बक्कल !"
आजोबा मोठयाने ओरडून म्हणतः
"अरे साल्या यमक्या,
मला देतोस धमक्या?यमकांच्या धंद्यामधे
मी आहे खमक्या !"

आजोबा आपल्याच नादात
स्वतःशीच गात असत,
गाता गाता मधेच थांबून
स्वतःशीच गोड हसत !

मी जवळ गेले की
मला म्हणतः
बेटा एक लक्षात ठेवः
एकटं एकटं जाता आलं पाहिजे;
स्वतःला स्वतःशीच गाता आलं पाहिजे !"

मी गोंधळून विचारीः
"म्हणजे काय?"
आजोबा मोठयाने हसून म्हणतः
" म्हणजे काय? म्हणजे काय?
म्हणजे नाकात दोन पाय !"

"आजोबा, एक गोष्ट विचारु?"
"विचार बेटा!"
"आजोबा, तुम्हांला मैत्रिणी होत्या का हो?"
"वा! वा! होत्या म्हणजे होत्याच की !
एक ती अशी होती,
दुसरी ती तशी होती !"

इतक्यात खोलीत आजी यायची,
आजोबांची जीभ एकदम बोबडी व्हायची !
आजोबा स्वतःला सावरायचे,
चटकन विषय बदलायचे,
घसा खाकरत म्हणायचेः
"बेटा, तुला गीतेमधला
स्थितप्रज्ञ कसा असतो ठाऊक आहे?
चालतो कसा, बोलतो कसा ठाऊक आहे?"

आजोबा संध्याकळी
अंगणातल्या झाडाखाली
आपल्या आरामखुर्चीवर
एकटेंच बसत;
एकटक डोळे लावून
दूर कुठे बघत असत...
दूरदूरच्या ढगात असत,
कुठल्या तरी न दिसणा-या जगात असत !!

पाय न वाजवता मी हळूच
तिथे जाई,
त्यांच्या आरामखुर्चीमागे
उभी राही!
काय बघत असतील हे?
मी दूर पाहीः
मला वेगळं काहीसुध्दा दिसत नसे,
तीच घरं...तीच झाडं...
सगळं अगदी तसंच असे !

पाय न वाजवता मी हळूच
परत मागे घरात यायची;
आजोबांची आरामखुर्ची
सावल्यांमधे बुडून जायची !

आजोबांच्या खोलीत आता
धुकं... धुकं... धुकं...
आजोबांचं जग सगळं
मुकं...मुकं...मुकं...




- मंगेश पाडगांवकर

Jul 9, 2009

आम्ही आणि क्रेडिट कार्ड वाली कन्या !!

आपण कुठल्या ना कुठल्या कामात असताना ह्या क्रेडिट कार्ड वाल्यांचा फोन येत नाही असे होत नाही. आधिमला सुध्दा संताप यायचा पण मग आता आम्ही ह्याचा आनंद घ्यायला शिकलो आहे, आणी आता तर आमचीखात्रीच झाली आहे कि हे फोन आम्हाला तणावमुक्त करण्यासाठीच येतात. आपल्यालाहि ह्यातुन काही फायदाव्हावा ह्या सदहेतुने आमचे संभाषण येथे देत आहोत. (ह्यात कोणालाहि दुखवायचा हेतु नाही.)

वेळ :- दुपारी .१५ (गरगरित जेवण करुन नुकतेच आडवे झालो आहोत)
कन्या :- गुड आफ्टरनून सर, आय एम कॉलींग फ्रॉम दरोडा बॅंक.
आम्ही :- जय महाराष्ट्र ! (पहिल्याच चेंडुवर षटकार)
कन्या :- नमस्ते सर, मी दरोडा बॅंकेमधुन बोलतीये, आम्ही एक नविन क्रेडिट कार्ड लॉंच करतोय त्या विषयीमाहिति द्यायला हा फोन केला होता सर. तुम्ही इंट्रेस्टेड आहात का सर ?
आम्ही :- कोणाच्यात ?
कन्या :- सर कार्डमध्ये हो
आम्ही :- ओह्ह अच्छा , काय आहे ना कि आयुष्यात पहिल्यांदा कोणीतरी येवढ्या गोड आवाजात इंट्रेस्टेडआहात का ? असे विचारले हो, त्यामुळे जरा गोंधळ उडाला बघा.
कन्या :- (मनातल्या मनात खुश झाली असावी) मग सर तुम्हाला कधि वेळ आहे ?
आम्ही :- अहो तुमच्या साठी वेळच वेळ आहे आमच्याकडे !
कन्या :- तसे नाही सर, ह्या कार्ड विषयी माहिती देण्यासाठी.
आम्ही :- अहो असे मला गोंधळवु नका हो, एक तर सुंदर मुलीशी बोलायचे म्हणजे आमची आधिच वाचाबसते. मला सांगा तुमच्याच कार्डची माहिती मी तुम्हाला कशी आणी का द्यायची ?
कन्या :- (डबल खुश होत ) अय्या अहो सर म्हणजे तुम्हाला कधी वेळ आहे ? आमचा प्रतिनिधी येउन तुम्हालापुर्ण माहिती देइल.
आम्ही :- एक प्रश्न विचारतो रागवु नका, तुमचे नाव मंजिरी आहे का हो ? आणी तुम्ही अहिल्यादेवी शाळेतहोता का ?
कन्या :- नाही ! आपण कार्ड विषयी बोलुयात का ?
आम्ही :- बघा रागवलात ना तुम्ही ? आहो एक खुप चांगली मैत्रिण होती हो माझी ह्या नावाची, अगदी असाचगोड आवाज आणी असेच जड जड मराठी शब्द वापरायची सवय होती हो तिला. तुमचा आवाज ऐकला आणीतिच आठवली बघा पटकन, माफ़ करा मला. म्हणतात ना आपली दुख: हि लोकासाठी विनोद असतात तेचखरे.
कन्या :- (भावुक स्वरात) नाही रागावले नाही सर. कुठे असतात त्या आता ? त्या पण बॅंकेत असतात का ?
आम्ही :- नाही हो, लहानपणीचा ताटातुट झाली आमची, कुठे आहे काय करते ... काही काही माहीत नाही हो. (आम्ही जमेल तेव्हड्या दु:खी सुरात)
कन्या :- (चिकाटी सोडता) ओह, सो सॉरी सर. आज वेळ काढु शकाल का सर तुम्ही ?
आम्ही :- हो जरूर, तुम्हाला भेटुन आनंदच होइल मला. पुन्हा त्या जुन्या आठवणी ताज्या होतील आणी मगआज तरी निदान दारू ची गरज लागणार नाही मला... (फुल्ल टु देवदास इस्टायील)
कन्या :- सर, मला भेटुन ? आमचा त्या भागातला एजंट येउन भेटेल सर तुम्हाला. मी नाही. (हळु हळु कन्यात्रासीक स्वरात बोलायला लागली आहे.)
आम्ही :- अरे असे कसे ? फोन करणार तुम्ही, वेळ देणार आम्ही तुम्हाला, आणी तो का भेटायला येणार ?मेहनत करे मुर्गा आपले मुर्गी आणी अंडा खाये फकीर ?
कन्या :- (प्रचंड नाराजीने) सर, आम्ही फक्त कॉल सेंटर साठी काम करतो. लोकांना भेटण्यासाठी वेगळी माणसेनेमली आहेत.
आम्ही :- अच्छा म्हणजे फोनवर टोप्या घालणारी आणी प्रत्यक्षात टोप्या घालणारी वेगवेगळी माणसे आहेततर !

Related Posts Plugin for WordPress, Blogger...