Oct 22, 2006
Thanks तरी म्हणा !
आयुष्याच्या अल्बममध्ये
आठवणींचे फ़ोटो असतात .
आणखी एक कॉपी काढायला
निगेटिव्ह्ज मात्र शिल्लक नसतात .
गजर तर रोजचाच
आळसाने झोपले पाहिजे,
गोडसर चहाचा घोट घेत
टॉम अँड जेरी पाहिल पाहिजे .
आंघोळ फ़क्त दहा मिनीटे?
एखाद्या दिवशी तास द्या,
आरशासमोर स्वतःला
सुंदर म्हणता आल पाहिजे .
भसाडा का असेना
आपल्याच सुरात रमलं पाहिजे ,
वेडेवाकडे अंग हलवत
नाचणंसुद्धा जमलं पाहिजे.
गीतेचा रस्ता योग्यच आहे .
पण एखादा दिवस पाडगावकराना द्या,
रामायण मालिका नैतिक थोर
"बेवॉच" सुद्धा एन्जॉय करता आली पाहिजे.
कधीतरी एकटे
उगाचच फ़िरले पाहिजे,
तलावाच्या काठावर
उताणे पडले पाहिजे.
संध्याकाळी मंदिराबरोबरच
बागेतसुद्धा फ़िरलं पाहिजे .
'फ़ुलपाखरांच्या' सौंदर्याला
कधीतरी भुललं पाहिजे.
द्यायला कोणी नसलं
म्हणुन काय झालं ?
एक गजरा विकत घ्या
ओंजळभरुन फुलांचा नुसता श्वास घ्या.
रात्री झोपताना मात्र
दोन मिनीटे देवाला द्या,
एवढ्या सुंदर जगण्यासाठी
नुसतं थँक्स तरी म्हणा!
Labels:
मराठी
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment